मराठी चारोळ्या

|
माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढी ती दुर जातात,

फुलांना जास्त कवटालळल्यावर पाकळ्या ही गळून पडतात,

ज्याला मनापासून आपलं मानलं तिच आपल्याला विसरुन जातात,

फुले वाळु लागली की फुलपाखरं देखील सोडून जातात...

***********************************************
पापण्यात लपलेली तुझी नजर
माझ्याकडे बघून लाजत आहे
तुझ्या पायातील पैंजण सुद्धा
माझ्या नावाने वाजत आहे.................
**********************************************
तुझ्या या लटक्या रागामुळेच
तर मी तुझ्यावर आहे फिदा,
जीवाला वेड लावणारी कातील,
अशी तुझी प्रत्येक अदा ..


**************************************************

तुझ्यावर प्रेम करतो हे
तुला सांगायचं राहिलं
हे सांगायच्या आधीच
तुला दुस-याबरोबर फिरताना पाहिलं

**************************************************

तुझ्यासाठी आणलेलं
गुलाबाचं लाल फुल
माझ्या हाताचच राहिला
कारण दुस-या कुणी दिलेला
गुलाबाचा लाल फुल
तुझ्या हातात पाहिला

*************************************************

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही,
सावलीशिवाय ,
"स्व" ची जाणिव कधीही होत नाही,
सावली नकोस शोधु ,
ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव,
डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,

*************************************************

प्रत्येक गोष्टीची वेळ असते
तेव्हाच ती घडायला हवी
वेळ निघून जाण्यापूर्वीच
तिची किंमत कळायला हवी.