ती एकदा आजीला म्हणाली...

|


ती एकदा आजीला म्हणाली
मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?

आपली माणसं सोडून तीनेच का
परक... घर आपलं मानायचं?

तिच्याकडुनच का अपेक्षा
जुनं अस्तित्व विसरायची

तीच्यावरच का जबरदस्ती
नवीन नाव वापरायची?

आजी म्हणाली अगं वेडे
हा तर सृष्टीचा नियम आहे

नदी नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडून

तो येतो का कधितरी तिच्याकडे
आपली वाट मोडून

तीच पाणी किती गोड तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळते

आपलं अस्तित्व सोडून ती
त्याचीच बनुन जाते

एकदा सागरात विलीन झाल्यावर
तीही सागरच तर होते

पण म्हणुन नेहमी तिच्यापुढेच
नतमस्तक होतात लोकं

पापं धुवायला समुद्रात नाही
गंगेतच जातात लोकं....

साथी.............

|
वो कोनसा यार मिला तुम्हे
जो साथी पुराना भूल गये
वो कोनसा यार मिला तुम्हे
जो साथ हमारा छोड दे....

सोबत...........

|
आपण त्याची सोबत धरावी
 ज्याला आपण आवडतो
 नाहीतर आपण आपल्या आवडीसाठी
 उगीच आयुष्य घालवतो........

मनातल्या मनात मी ..

|
मनातल्या मनात मी...मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो !

अशीच रोज नाहुनी
लपेट उन्ह कोवळे
असेच चिंब केस तू
उन्हात सोड मोकळे

तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो !

अशीच रोज अंगणी
लवून वेच तू फुले
असेच सांग लाजुनी
कळ्यांस गूज आपुले

तुझ्या कळ्या, तुझी फुले इथे टिपून काढतो !

अजून तू अजाण ह्या
कुंवार कर्दळीपरी
गडे विचार जाणत्या
जुईस एकदा तरी
'दुरून कोण हा तुझा मरंद रोज चाखतो...?'

तसा न राहिला अता
उदास एकटेपणा
तुझीच रूपपल्लवी
जिथे तिथे करी खुणा
पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो !
.................................... "

मैत्री कशी असावी ?????

|





मैत्री कशी असावी ???
जी कधीही पुसली न जावी...
जशी रेघ काळ्या दगडावरची...
कोणतही वातावरण पेलवणारी...
एखाद्या लवचिक वेलीसारखी...

कुठेही दडली तरी अस्तित्व दाखवणारी...
कुठेही चमकणा-या हि-यासारखी...
थोड्याश्यावर न भागणारी...
दुष्काळात तहानलेल्या मनसासारखी...

पवित्रतेने परिपूर्ण अशी...
देववरची फुले जशी...

कधीही न संपणारी...
विशाल सागरासारखी...
सतत बरोबर असावी...
शरीराच्या प्रत्येक अवयवासारखी...

तुटली तरी कायम आठवणीत असणा-या...
आयुष्यातल्या सोनेरी क्षणासारखी.......

मैत्री अशी असावी...
प्रत्येक तासाला, क्षणात बदलणारी...
मनाला तजेला देणारी...
कधीही न मरणारी...
अमर झालेल्या जिवासारखी.........

थोडासा थांब बघतर मागे वळून.....

|
 
 
 
थोडासा थांब बघतर मागे वळून
कुठेपर्यंत आले आहे मी
तुझ्या सोबत तुझ्या नकळत
थोडासा थांब बघतर जरा

हे डोळे फक्त तुझीच वाट बघत आहे
रात्रदिवस
थकलेत् रे ते
त्याना एकदा अलगद
तुझ्या ओठानी पुसून तर जा जरा

थोडासा थांब बघतर जरा

तुझ्या नसन्याने तुझ्या
असण्याचे महत्व कळला आहे मला

तुझ असण पुन्हा एकदा देऊन तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा

तुझ काम, तुझ घर, तुझे मित्र, तुझ विश्व
सगळ सगळ मान्य मला
पण इथे कुणीतरी तुझ्यासाठी एक जग उभ केलय
ते बघून तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा

हा चंद्र सुद्धा हसतो मला
म्हणतो, ज्याला तू आमच्यात शोधत असत्तेस रात्र रात्र
तोही तुझ्यासाठी झुरततोय का असाच
त्या चंद्राला उत्तर देऊन तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा

आठवण तुलाही येते माझी
पापणी तुझी ही ओलवते अश्रूनी
त्या अश्रूना माझ्या ओंज़ळीत देवून तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा

तुझ हसण तुझ बोलण
तुझा राग तुझ गप्प राहण
घेऊन गेलास तुझ्याबरोबर तू सर्व
ज़गण्यासाठी तेवढेच आहे रे माझ्याकडे
माझ जगण देऊन तर ज़ा जरा...
थोडासा थांब बघतर जरा

माझ्या ज़वळ थोडा बसतर जरा
माझा सहवास, माझा श्वास, माझी सोबत
अनुभव तर जरा
थोडासा थांब बघतर जरा

प्रेमात म्हणे न सांगता न बोलता
सर्व काही कळत
मग न सांगता न बोलता
मला समजून तर घे जरा
थोडासा थांब बघतर जरा

तुझ्यात स्वत:लाच हरवून
बसले मी कुठेतरी
जरा येऊन मला माझेपन
शोधून तर दे जरा
थोडासा थांब बघतर जरा

माझ्या दिवसात, माझ्या रात्रीत
माझ्या प्रत्येक क्षणात तू आहेस
व्यापून टाकल आहेस तू मला
माझा एक एक क्षण
मला परत देऊन तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा

एकदा, फक्त एकदाच माझ्या मनात डोकवून तर जा
स्वता:लाच बघितल्यावर कस वाटत
ते सांगून तर जा जरा...
थोडासा थांब बघतर जरा

कुणी ते पाण हलवण्या आधी
आणि तो इवलसा थेंब कुठेतरी लुप्त होण्याआधी

एकदा प्रेम करुन तर जा जरा...
थोडासा थांब बघतर जरा
शेवटचा थोडासा थांब

कसलीही अपेक्षा नाही... की कासलही बंध नकोत
प्रेम केल आहे तुझ्यावर... त्यात कसले व्यवहार नकोत
भावनाच फक्त कळतात रे मला
त्याचा पलिकडचे काहीही नको
एकदा त्या भावनाना स्पर्शून तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा

ह्या वेडीला थोडस शहाणपण शिकवून तर जा जरा.
थोडासा थांब बघतर जरा

***विजय मांडवकर***
|


आई वडिल

|

दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती.

|
दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती...एके दिवशी ते लपा-छपि खेळत होते, खेळताना .......

मुलगा फुलपाखरू :- चल  एक छोटासा नवीन  खेळ आपल्या दोघांच्यात ....
मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!
मुलगा फुलपाखरू :- आपल्या दोघांमध्ये,  सकाळी सकाळी ह्या समोरच्या फुला मध्ये जो सर्वात प्रथम  बसलेला असेल तो दुसऱ्या पेक्षा जास्त प्रेम करतो ....
मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी, मुलगा फुलपाखरू त्या फुलाच्या जवळ येऊन उभा राहिला आणि ते फुल उमलण्याची वाट पाहू लागला जेणेकरून तो तिच्या आधी त्या फुलामध्ये बसेल आणि तिला दाखवून देईल कि त्याचे तिच्यावर खूप खूप प्रेम आहे ....


थोड्याच वेळात फुल उमलले ........ पाहतो तर काय ????????????
.
.
.
.
.
.
.
.
ती मुलगी फुलपाखरू त्या उमलेल्या फुला मध्ये मरून पडली होती ........ कारण,  रात्रभर ती त्या फुला मधेच राहिली होती फक्त ह्या वेड्या अपेक्षेने कि सकाळ होताच आणि ते  फुल उमलताच ती त्या मुलगा फुलपाखरू कडे आनंदाने झेप घेईल आणि त्याला दाखवून देईल कि ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते ते ..........




आणि खरेच तिचे प्रेम जीवापाडच होते ..... नाहीका ?

मी जगले तुम्ही पण जगा! - सिंधुताई सपकाळ

|

"एका रात्रीसाठी घर देता का, अशी विनवणी करूनही कुणी मला घर दिलं नाही. पण आज मी अनेकांना घर दिलं. दुःख कुरवाळत बसले की दुःख आपल्याला खाते. जागणे महत्त्वाचे. मी जगले तुम्ही पण जगा'', अशा शब्दात सिंधुताई सपकाळ यांनी जगण्याचा अर्थच दापोलीकरांना सांगितला.
मैत्री प्रतिष्ठान टेटवली आयोजित विवेकानंद व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या.

यावर्षी प्रथमच टेटवलीच्या मैत्री प्रतिष्ठानने दापोलीत विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेचे काल पहिले पुष्प सिंधुताई सपकाळ यांनी गुंफले. हजारो अनाथ बालकांचा सांभाळ करणारी ही माऊली राधाकृष्ण मंदिराच्या सभागृहात येताच दापोलीकरांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांना मानवंदना दिली आणि त्यानंतर सिंधुताईंनी आपले जगणेच उलगडून दाखवले. कविता, शेर, कधी मिश्‍किल टिपणी करीत सिंधुताईंनी त्यांचे जगणे मांडले आणि उपस्थित दापोलीकर भारावून गेले. ताई म्हणाल्या, ""हाफटाईम चौथी पास आहे मी. पण आज अमरावती विद्यापीठाच्या सिनेटवर आहे. माझ्यावर सिनेमा निघाला. कर्नाटकात दहावीच्या अभ्यासक्रमात माझ्यावर धडा आहे; मात्र महाराष्ट्रात नाही. कारण महाराष्ट्रात मेल्यावरच माणसे मोठी होतात. जिथे मेल्यानंतर माणसे मोठी होतात, त्याला महाराष्ट्र म्हणतात. असे असले तरी इथली माती महान आहे. त्यागाची आहे. बलिदानाची आहे आणि माझे या मातीवर आणि देशावर प्रेम आहे. अमेरिकेत मी साहित्य संमेलनात बोलायला उभे राहिल्यावर भारत माता की जय, जय महाराष्ट्र अशा घोषणा झाल्या आणि मी भारावून गेले. जगात कुठल्याही देशाला माता म्हणत नाहीत. हा मान फक्त माझ्या देशाला आहे. माता म्हणजेच माझ्या देशाला माऊली म्हटले जाते. म्हणून स्त्री जगली पाहिजे. तिची हत्या करू नका. जरी स्त्री जगली तरच राष्ट्र जगेल. आपल्या संस्कतीचा, परंपरेचा मान ठेवला पाहिजे. वाढदिवसाला फूंक मारून मेणबत्त्या विझविण्याची आमची संस्कृती नाही. स्त्रियांनी अंगभर कपडे घातलेच पाहिजेत.''

मला माझ्या नवऱ्याने घराबाहेर काढले. मुलगी झाल्यावर तिची नाळ मी दगडाने तोडली. स्मशानातील निखाऱ्यांवर स्मशानातल्याच पिठाची भाकरी भाजून खाल्ली. रेल्वेत भिक मागितली. स्मशानातल्या भाकरीने मला जगायला शिकवले आणि मग मी अनाथ मुलांची आई झाले. माझ्या नवऱ्यालाही माफ केले. स्त्रियांनी माफ करायला शिकले पाहिजे. मी जगले. परिस्थितीवर मात करून जगले. म्हणून आज इथवर आले आहे. जगणे सुंदर आहे. त्यामुळे दुःख कवटाळून न बसता जगायला शिका, असे सिंधुताईंनी यावेळी सांगितले.

मैत्री म्हटली की…...

|
मैत्री म्हटली कीFrnds
आठवतं ते बालपण
आणि मैत्रीतुन मिळालेलं
ते खरंखुरं शहाणपण
कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही
मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यांत श्रेष्ठ
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्ट
मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सुत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सुप्त भुक
मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्र मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात
मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजुन
चिंब-चिंब नाहली
मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देउन
गालातल्या गालात हसणारे…

- विजय

हा भास तुझा होताना…….

|
मी स्वत:स हरपून जाते, हा भास तुझा होताना
नसलास जरी समोर तू,वाटते जणू असलेला
स्वप्नात माझ्या येउन हैराण मला का करतो
अन अवचित जाग ही येता, तू असाच भवती विरतो!
वेगाने वाहून वारा ,हे केस जेव्हा उडवतो
वाटते मनाला माझ्या, की तूच बटा खेळवतो..
झाडांची अलबेल शाखा ह पदर असा अडवते
ह्र्दय असे धड्धडते जणू तुझीच चाहुल घडते!
पावसांचे अलवार थेंब या ओठांवर ओघळती
वाटॆ तुझाच स्पर्श होई, पण तो ही भासच ठरतो!!
ताटकळत कैक वेळा , वाट तुझी मी बघते
पण तू न ये सामोरा , मन उगा हताश होते !
न कळे मजला क मी, उगाच तुझ्यावर रुसते
मग येता तू सामोरा, गालातच खुद्कन हसते!!
हा भास तुझा होताना……..

-  विजय

एवढे एक करशील ना ?

|
शब्दांत नाही सांगता येणार
डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?

अस्वस्थ होइन मी जेव्हा
धीर मला देशील ना ?

माझ्याही नकळत दुखावले तुला तर
माफ़ मला करशील ना ?

ओघळले अश्रु माझे तर
अलगद टिपून घेशील ना ?

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना ?

सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?

चुकतोय मी असे वाटले कधी तर
हक्काने मला सांगशील ना ?

हरवलो मी कुठे कधी जर
सावरून मला घेशील ना ?

कितीही भांडलो आपण तरीही
समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?

मी आता विसरणे शक्य नाही तुला
तू मला लक्षात ठेवशील ना ?

जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?

मला तुझी गरज आहे, हे
न सांगता ओळखशील ना ?

आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो,
पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?

तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो
तरी माझ्यासाठी..........
तूच एक असशील ना ?

आठवण आली तुझी की

|
आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..
आठवण आली तुझी की,
माझं मन कासाविस होतं
मग त्याच आठवणीना..
मनात घोळवावं लागतं..
आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..
जाणवतं आहे ते अशक्य…
कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य…

पण तरिही………
आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी….
नाही जमलं जे या जन्मी

मिळू देत ते पुढच्या जन्मी 
 
(( विजय मांडवकर ))

एकदा काय झालं,

|
एकदा काय झालं,
एक सरिता रागवली
आपल्या boyfriend ला म्हणाली

'हे रे काय सागर !
मीच का म्हणून ?

दर वेळी मीच का
मीच का यायचं खाली डोंगरावरून ? 
आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठी
दरी बघायची नाही
कडा बघायचा नाही
कशी सुसाट पळत येते मी
विरहव्याकुळसंगमोत्सुक
कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन
तुझ्यात हरवून , हरपून जाईन

आणि तू वेडा
तुझं लक्षच नसतं कधी 
सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावू असतोस.
उसळतोस तिच्यासाठी
तुझ्यासाठी पाणी आणते मी
पण तुला भरती येते तिच्यासाठी

मी नाही जा !
बोलणारच नाही आता.
येणारही नाही.
काठावरच्या लोकांना सांगून
मोट्ठं धरण बांधीन 
थांबून राहीन तिथेच.
बघच मग.

सरिताच ती
बोलल्याप्रमाणे वागली.
सागर बिचारा तडफ़डला
आकसलाआतल्या आत झुरत गेला.
शेवटी फ़ुट्ला बांध त्याच्याही संयमाचा
उठला ताड
ओरडला दहाड
उफ़ाळला वारा पिऊन
लाटांचं तांड्व घेऊन 
सुटला सुसाट
सरितेच्या दिशेने

लोक येडे.
म्हणाले ' सुनामी आली ! सुनामी आली !!'