एक प्रेम कथा....!!!

|
एक प्रेम कथा....!!! एक मुलगा होता, कैंसर असलेला आणि जास्तीतजास्त एकच महीने आयुष्य असलेला. एक मुलगी त्याला आवडत होती, जी एका Music CD च्या दुकानामध्ये काम करीत होती. परंतु त्याने त्या मुलीला आपल्या प्रेमाविषयी काहीच सांगितलेले नव्ह्ते..... नेहमी तो तिच्या दुकानात जात होता आणि एक सीडी विकत घेत होता, का - तर तिच्याशी दोन शब्द बोलता यावे म्हणून .... महीना उलटला...त्याचे आयुष्य ही संपले. महिन्यानंतर ती मुलगी त्याच्या घरी जाते....तो गेलेला आसतो हे त्याच्या आईकडून तिला कळते. तिला वाईट वाटत. आणि एक गोष्ट तिला तिथे दिसते ती अशी की, त्या सर्व सीडींपैकी एकपन सीडी त्याने उघडूनसुद्धा पाहिलेली नसते. याचे तिला खूप रडू येते. ती रडते रडते आणि शेवटी ती पण निघून जाते. तिच्या रडण्याचे कारण की, त्याला दिलेल्या प्रत्येक सिडिच्या कव्हरमध्ये त्याच्यासाठी एक चिट्ठी तिने ठेवली होती. ती सुद्धा त्याच्यावर प्रेम करत होती.........

0 प्रतिक्रिया:

टिप्पणी पोस्ट करा