पाउस.... असते एक आठवण
कोरड्या मनातील ओली साठवण...
पाउस.... असतो एक ताजवा
किर्र झाडीतला तिमतिमता काजवा...
पाउस.... म्हणजे गारवा
कुन्द मनाचा बेधुन्द मारवा...
पाउस.... म्हणजे भास
नजरेत सदा एका नजरेची आस...
पाउस.... असतो शिरकाव
वेड्या सारंगाची लाटेवरील नाव...
पाउस.... असते एक साथ
जसा सांजवेळी हातात प्रेयसिचा हाथ...
पाउस.... म्हणजे एक हर्ष
गार मायेचा सर्वांगस्पर्श...
पाउस.... फक्त पाउस... बाकी सारे नश्वर
जसा नभ,हि धरा व्यापून बरसे तो ईश्वर....!
कोरड्या मनातील ओली साठवण...
पाउस.... असतो एक ताजवा
किर्र झाडीतला तिमतिमता काजवा...
पाउस.... म्हणजे गारवा
कुन्द मनाचा बेधुन्द मारवा...
पाउस.... म्हणजे भास
नजरेत सदा एका नजरेची आस...
पाउस.... असतो शिरकाव
वेड्या सारंगाची लाटेवरील नाव...
पाउस.... असते एक साथ
जसा सांजवेळी हातात प्रेयसिचा हाथ...
पाउस.... म्हणजे एक हर्ष
गार मायेचा सर्वांगस्पर्श...
पाउस.... फक्त पाउस... बाकी सारे नश्वर
जसा नभ,हि धरा व्यापून बरसे तो ईश्वर....!
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा