आई आणि मुलाची एक हृदयस्पर्शी कथा ....

|
एका गांवात एक स्त्री गांवाबाहेर आपल्या लहान मुलाला घेऊन एकटीच रहात होती. मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेले होते. मुलाचे नाव होते लक्ष्मणदेव. आई धुणीभांडी करून आपला चरितार्थ चालवित होती. मुलगाही आईला कामात मदत करत असे. काम करून तो लांबच्या शाळेत पण जाई.
... एक दिवस तो शाळेतून परत आला तर आई झोपलेली होती. तिला खूप ताप भरला होता. लक्ष्मण आईची सेवा करू लागला. बरेच दिवस झाले तरी आईच...ा ताप उतरेना. खांण बंद झालं. ती खूप अशक्त झाली. लक्ष्मणाला घरची बाहेरची सर्वच कामे करावी लागत. आईची सेवा तो अगदी मन लावून करत असे. तिला दूध गरम करून देणे तिची औषधं वेळच्या वेळी देणे.


एका रात्री आईने लक्ष्मणाला हाक मारली. 'लक्ष्मणा थोडे पाणी देतोस' लक्ष्मण घरात पाणी आणायला गेला. पाणी घेऊन तो परत आला तेवढयात आईला झोप लागली. गुंगीत आई पडून होती. रात्र संपली पहाट झाली. गार वार्‍याच्या झुळुकीबरोबर आईला जाग आली. तिने पाहिले समोर हातात पाण्याचा पेला घेऊन लक्ष्मण उभा होता. आई म्हणाली 'लक्ष्मणा अरे तु रात्री झोपलाच नाहीस का ? वेडया अरे मला उठवायचे नाही कां ?
लक्ष्मण आईच्या हातात पाण्याचा पेला देत म्हणाला, 'आई अग माझ्या लहानपणी माझ्यासाठी तु किती रात्री जागुन काढल्यास मग मी एक रात्र तुझ्या करता जागलो तर काय झालं'.

भेट.....

|
आज खुप वर्षानी ती भेटली,
पाहताच तिला मनात वीज चमकून गेली,
काय बोलू नी काय नको याचा विचार करत होतो,
इतरांच्या नजरा वाचवून एकमेकाकडे चोरून पाहत होतो,


फक्त नजरेचा खेळ चालू होता,
आत्ता मात्र माझा धीर सुटला होता,
लग्नाचे विचारून पाहिले तिला,
हळूच लाजुन तिने होकर कलविला,


तिचा जायचा दिवस आला,
पण तिचे जाने पटत नव्हते मनाला,
तिचा दुरावा बोचत होता मनाला,
सांगत नसली तरी तिच्या डोळ्यात मात्र दिसत होता मला,


जाता जाता मी विचारले पुन्हा कधी भेटशील मला,
उत्तर नाही पण छानसे स्माईल मात्र देऊन गेली मला...
त्या स्माईल मध्ये खुप काही दडल होते,
आमच्या पुढच्या भेटीची स्वप्ने....

जीवन म्हणजे सागर . . .

|
जीवन म्हणजे एक सागर, कधी शांत तर कधी वादळ,

कधी नशिबाने भरभरलेली, तर कधी फ़क्त अपेक्षांनी भरलेली घागर,

कुणाच्या सुखाला कधी कोण वाटेकरी, तर कुणा एका बरोबर फ़क्त दु:खाची चादर,

सागराला कित्येक नद्यांची जोड़ मिळते,

काही सोबतच राहतात, तर काहिना नविन वाट फूटते,

कधी उंच लाट बनत स्वप्नांना कवेत घेण्याची हौस असते,

तर कधी ओहोटी बनुन तुटलेल्या स्वप्नांची रास असते,

सागरात इच्छा आकांक्षाच्या बेटांची रीघ असते,

तर ते पूर्ण करण्यासाठी सुरु असलेली शर्यत असते,

या सागरात सगळ्यांना सामावून घेण्याची ताकत असते,

तर कधी कोणाला तारन्याची वा मारण्याची देखिल शक्ति असते,

अशा या सागराला माणुसकीची जोड़ असावी,

स्वत: साठी खारट तर दुसर्यांसाठी नेहमी गोडी असावी,

देवा माझ्या जीवनरूपी सागराला तुझ्या आशिर्वादाची नदी मिळावी,

शरीररूपी या देहामधे इतरांसाठी माणुसकी आणि भावना सतत जिवंत रहावी . . .

स्वप्नांची दुनिया.....

|
प्रेमाचे स्वप्न मी 
तुझ्या बरोबर सजवले होते
पण त्यांनाच तुटताना
उघड्या डोळ्याने  पहिले होते


नको त्या गोष्टीकडेच
मन नेहमी धावत असते
मृगजळ आहे ते स्वप्नातले
हेच मनाला रोज  समजावत असते


यात मनाचा काय दोष
खेळ तर नशिबाचा असतो ना
पण मनालाच यातना होतात
चूक तर आपलीच असते ना


विचारात जे असते कधी
आचरणात येते का
तरी पण विचार येतच असतात
बंधने त्यासाठी असतात का


छोटेसे मन माझे
स्वप्न  मात्र मोठे होते
स्वप्नाना तुटत बघताना
डोळे मात्र रडत होते


एका चुकीच्या निर्णयामुळे
जीवन अगदी बदलून जाते
वेळ असते तेव्हाच सावरावे लागते
हे आज मनाला कळून चुकले

प्रेमाचा सहवास....

|
होती ती माझ्याबरोबर सुखात
नसताना ती आज..धीर द्यायला मला
कोणीच नाही माझ्या दुखा:त.....

कश्या विसरू तिच्या मी आठवणी
नसताना ती समोर पाहून,
आरसा मलाच देतोय हेल्कावणी.....

इच्छेपायी सोडलं तिनं हे जग,
सोडलं....मीच माझ अस्तित्व
तिच्यासाठी मग.......

चीता जळत्याय...धूर येतोय ,
पुढच काहीच दिसत नाही...

धुराशीही भांडत भांडत ती
प्रतिमेतून माझ्या समोर येते ,
पाणावलेल्या माझ्या डोळ्यांना त्रास नको म्हणून ,
तीच  नकळत माझे डोळे पुसते......

चीता जळली...राख झाली ,
संपवलं तीन शरीराच आस्तित्व...
नुसत्याच आता आठवणी जपायच्या,
हृदयात सामावलेल्या तिच्या  फोटोतूनच....

पावसाच्या थेंबाप्रमाणे अश्रू हे माझे टीपकत होते,
सहवासच तिचा असा होता कि..,
सुकताना अश्रू दरवेळी तिचाच विचार करत होते.......

ती नाही या जगात सर्वांनाच हे कळल होत...
पण पटवू कस मी माझ्या मनाला....
जे तिचंच आस्तित्व सारखं जाणवून मला देत  होत....

ती गेली जग सोडून.....सोडून सगळ्या आठवणी
आज देखील देवाशीच भांडतोय रोज मी ,
तिच्या या मृतुच्या पडताळणीसाठी .....

ती गेली हे जीवन सोडून ,
जिवंतपणीच मला मारून  ,
देवाचाच राग भोगतोय दररोज
पण आज हि  मरतोय मीच.
जिवंतपणे दररोज.........

म्हणून तर बघा - I LOVE YOU

|
कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं
आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं
जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं
यातला फरक समजू लागतो
नाही नाही म्हणता आपणही
प्रेमात पडू लागतो




कधी हसणं विसरून गेलो तर
ते हसायला शिकवतात
जीवन हे खऱ्या अर्थाने
जगायला शिकवतात

पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात....

आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं
त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं

कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,
प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी
त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी

म्हणूनच ........
असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ
जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर
एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा
" I LOVE YOU "